Past Life Regression (PLR) थेरपी
Past Life Regression (PLR) थेरपी
PLR थेरपी ही प्रक्रिया कर्म-सिद्धांत यावर आधारलेली आहे. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ही आपल्या पूर्व जन्मातील कर्माचे फलित असते. आज समस्या म्हणून समोर येणाऱ्या बाबी पूर्व जन्मातील आपल्याच कर्माचे फलित असतात. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ याची जागोजागी साक्ष देतो. श्री गुरुचरित्र आणि PLR याविषयी माहितीसाठी व्हिडीओ पहा.
PLR थेरपीविषयी अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ पहा.
PLR थेरपीचा हेतू
आपल्या आयुष्यातील न उलगडणाऱ्या आर्थिक समस्या, नातेसंबंध विषयक समस्या, आरोग्य विषयक समस्या आणि इतर समस्या सोडविण्यासाठी PLR थेरपीचा उपयोग करता येतो.
अध्यात्मिक उन्नती, गुरुंची भेट यासाठीही PLR थेरपीचा उपयोग करता येतो.
PLR थेरपीची पूर्वतयारी
PLR थेरपीसाठी कोणतीही विशेष पूर्वतयारी करावी लागत नाही. आपले प्रश्न सोडविण्याची प्रबळ इच्छा, मन शांत ठेवण्याची तयारी पुरेशी ठरते. परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि या प्रक्रियेवर विश्वास असेल तर थेरपी जास्त यशस्वी होते.
PLR थेरपी कधी करता येत नाही?
१८ वर्षे पूर्ण झालेल्या मानसिकदृष्ट्या स्थिर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची PLR थेरपी करता येते.
मानसिकदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या व्यक्ती, स्किझोफ्रेनिया, स्प्लिट पर्सनॅलिटी, बायपोलर डिसऑर्डर, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी, दुहेरी व्यक्तिमत्व, हिस्टेरिया यासारखे आणि इतर मनोविकार असल्यास PLR थेरपी करता येत नाही.
लहान मुलांची PLR थेरपी होत नाही.परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या आई-वडील यापैकी एकाची PLR थेरपी करून मुलांच्या समस्यांचे उत्तर मिळविता येऊ शकते.
केवळ गतजन्म पाहावयाचा आहे अशा निव्वळ कुतूहलासाठी PLR थेरपी केली जात नाही.
या संदर्भात व्हिडीओ पहा.
PLR थेरपी प्रक्रिया
- PLR थेरपी मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये केली जाते.
- PLR थेरपी या प्रक्रियेत २ सत्रे होतात. दोन्ही सत्रे मिळून ही प्रक्रिया पूर्ण होते.
- प्रत्येक सत्र २ ते ३ तासांचे असते.
- दोन्ही सत्रे पूर्णतः ऑफलाईन आहेत. ती ऑनलाईन होत नाहीत.
- दोन्ही सत्रे औंध, पुणे येथे घेतली जातात.
- दोन्ही सत्रे स्वतंत्र दिवशी होतात.
- पहिले सत्र झाल्यावर दुसरे सत्र लगेच दुसऱ्या दिवशी करता येते. दोन सत्रांमध्ये सोयीनुसार काही दिवसांचे अंतरही ठेवता येते. परंतु हे अंतर १५ दिवसांपेक्षा जास्त असू नये.
- पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण केस हिस्ट्री घेतली जाते. त्यावेळी बरेचसे प्रश्न विचारले जातात. थेरपी यशस्वी होण्यासाठी काहीही न लपविता खुलेपणाने उत्तरे देणे आवश्यक आहे.
- दुसऱ्या सत्रामध्ये व्यक्तीला रिलॅक्सेशन मध्ये नेऊन ध्यानाच्या खोल अवस्थेत PLR थेरपी पार पाडली जाते. जी समस्या आहे तिचे मूळ ज्या गतजन्मामध्ये आहे त्या गतजन्मामध्ये जाऊन ती समस्या सोडविली जाते.
PLR थेरपी मधील सत्रांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पहा.
गोपनीयता
PLR थेरपी या प्रक्रियेत त्या व्यक्तीविषयी झालेला संवाद, थेरपी दरम्यान उघड झालेल्या बाबी या ती व्यक्ती आणि थेरपिस्ट यांच्यातच गोपनीय ठेवल्या जातात. त्या इतर कुणालाही सांगितल्या जात नाहीत.
विशेष सूचना
PLR थेरपी आधी, थेरपी दरम्यान आणि थेरपी नंतर कोणतेही औषध दिले जात नाही.
थेरपी दरम्यान आणि थेरपी झाल्यावर कोणताही त्रास होत नाही.
थेरपी सत्राचे रेकॉर्डिंग दिले जात नाही. जे अनुभवले ते व्यक्तीच्या लक्षात राहते.
antarbrahma मधील PLR
antarbrahma मधील PLR ही एक अध्यात्मिक अनुभती आहे. ते नेमके कसे घडते यासाठी पुढील व्हिडीओ पहा.
अपॉइंटमेंट
अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी WhatsApp संपर्क करा.